नांदेडकरियर

Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या क-झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला विजेतेपद  – NNL

नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या क-झोन स्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने भोकर येथे या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. महिला कबड्डी स्पर्धेत महाविद्यायाचा याच्या गौरी दहे या विद्यार्थीनीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.

कबड्डी स्पर्धेत मुलीच्या संघाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव, सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड, शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख डॉ.साहेबराव मोरे आदींनी विजयी संघाचे कौतुक केले आहे.विजयी संघाला प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ.राहुल सरोदे,प्रा.डॉ.शेख बुशरा, प्रा.ललिता अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यापीठ अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल यशस्वी मुलीच्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड, डॉ.गणेश ईजळकर, डॉ.शोभा वाळूककर, डॉ.एल व्ही.खरात, प्रा.शशिकांत हटकर,प्रा.करण हंबर्डे,प्रा.भीमराव वानखेडे, यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी इत्यादीने अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button