Shrivaraha Swamy Jayanti : पंचमुखी हनुमान मंदिर श्रीबागेश्वर धाम कार्यालयात श्रीवराह स्वामी जयंती उत्साहात साजरी
नांदेड| पंचमुखी हनुमान मंदिर परिसर,श्रीबागेश्वर धाम कार्यालय, गणेश नगर, नांदेड येथे श्री वराह स्वामी जयंती मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात साधू-संत, मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामूहिक हनुमान चालीसाचे गजर घुमला आणि वातावरण भक्तिमय झाले. यावेळी भजन संधेचे आयोजनही करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
श्री वराह स्वामी जयंतीचे औचित्य साधून पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या तोरणांनी केळीच्या घडांची सजावट करण्यात आली होती. सर्वप्रथम विधिवत पूजा-अर्चा व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर उपस्थित साधू-संत, गुरु महाराज व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे घेतलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठणामुळे मंदि...
