Rajendradass maharaj ; राज्यमाता घोषित झाल्यानंतरही महाराष्ट्रात गायींची हत्या व तस्करी सुरूच आहे – श्री राजेंद्रदासजी महाराज
हिमायतनगर/नांदेड,अनिल मादसवार। आम्हाला नुकतेच समजले आहे की, अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यातील गोरक्षक आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने गायींच्या तस्करीचे आणि कत्तलीचे सुमारे १७५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यांमध्ये गोहत्या बंदी नाही. त्यामुळे भारताच्या काही भागातुन विदर्भातील यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातुन नांदेड मार्गे तेलंगणा राज्यात तस्करी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे कर्तव्य आहे की, त्यांनी एकत्र येऊन गो तस्करी थांबवावी आणि सरकारने घोषित केलेल्या राज्यमाता व गोसंवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा आणि संपुर्ण राज्य गोहत्या पापापासुन पुर्णपणे मुक्त व्हावे असे विचार श्री राजेंद्रदासजी महाराज यांनी व्यक्त केले.
ते हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील शिव महापुरान कथेच्या वेळी बोलत होते, एक वर्षापुर्वीच नांदेड जिल्हामध्ये, कसायांनी एका अतिशय प्रा...
