Shahapur Yatre’s prompt response : शहापुर यात्रे’स उस्फुर्त प्रतिसाद -NNL
देगलूर| तालुक्यातील शहापुर येथील विठ्ठल- रूक्माई मंदिराच्या वार्षिक उत्सव अंतर्गत मोठी यात्रा पार पडते हि यात्रा 24 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत असते यात्रेच्या अनुषंगाने लोहा व पुसद सह आधी ठिकाणचे नाट्य मंडळे यात्रेत आवर्जून सहभागी होत असतात तब्बल दहा हजार हून अधिक यात्रेकरूची यात्रेत ये- जा असते येथे 17 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून, सप्ताहाचा कालावधीत अनेक संत मंडळीचे किर्तन विषयक कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे दिसून आले.
या सप्ताहाची सांगता 24 डिसेंबर रोजी ह. भ. प. एकनाथ महाराज पाळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल तेव्हा या हरिनाम सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावेत असे आवाहन विठ्ठल- रूक्माई मंदिर अध्यक्ष गंगा रेड्डी कोटगीरे, माजी जि. प. सदस्य शिवाजी कनकंटे , जिल्हा मजूर फेडरेशन तालुका संचालक रामलुरेड्डी ईलतेपवार, मल्लन रेड्डी चिंतलवार, राजेंद्र दंडोड, मल रे...
