youth’s self-immolation warning | जि.प. नांदेड च्या उदासीन धोरणाला कंटाळून युवकाचा आत्मदहन ईशारा -NNL
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद हे आपल्या अनेक करणाम्यामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात अनेक छोटे मोठे प्रकरण सपशेल दाबण्याचा हातखंडा येथील कर्मचारी आणि अधिकारी यांना चांगलाच जमतो हे अनेक प्रकरणातून सिद्ध झाले आहे. असाच काहीसा अजब प्रकार हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा येथील युवक संतोष रामराव डवरे याच्या सोबत घडल्याने त्याने चक्क १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त संभाजी नगर, जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २००८ साली पार पडलेल्या अनुसूचित जमाती उमेदवारासाठी कंत्राटी ग्राम सेवक पद भरतीत अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने सदरील युवकाने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागवली. परंतू आपल्या जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होव...
