Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. उद्या सकाळी 11 वा. छाननीला सुरूवात होईल. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या बुधवार 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. छाननीचे काम लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विधानसभेसाठी त्या-त्या स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकते. त्यामुळे छाननी नंतर व 31 ऑक्टोबरला अर्ज परत घेतल्या जाऊ शकतात. येणाऱ्या काळात शासकीय सुट्ट्या असल्यामुळे उद्या छाननी झाल्यापासून तर 31 ऑक्टोबरला पूर्ण दिवस व 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. 4 नोव्...
