Dispute Application ; दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती)
माहूर। मौजे दत्तमंजारी ता. माहूर येथील विद्यमान सरपंच यांचे सदस्यत्व व सरपंच पद अपात्र घोषित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मनोज किर्तने यांनी ॲड.जे एन काकडे यांचे मार्फत नांदेड जिल्हाधिाऱ्यांकडे केली आहे.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री मुरादे यांनी साहेबराव वाघमारे, दयाळु जाधव, बंडु चव्हाण व इतर गावकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.२० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत मध्ये येवून व प्रत्यक्ष फिरून चौकशी केली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी मध्ये एक लक्ष पंचांनव हजार रुपयांचा (१९५०००) अपहार झाल्याचा त्यांनी स्पष्ट अहवाल गटविकास अधिकारी माहुर यांना दिला होता.
या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने यांनी विद्यमान सरपंच सुलोचना अर्जुन पवार यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र करावे या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( ग) नुस...
