Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL
नांदेड | सरदार वल्लभभाई पटेल हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री पदावर असताना भारतातील संस्थान विलीन करुन देश एकसंघ करुन अखंडता राखली. मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानातून मुक्त होत नव्हता तेंव्हा पोलिस अॅक्शन प्लॅन आखून हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्ती लढ्यासाठीही मोठे योगदान देणारे महान राजकीय नेते होते म्हणून ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. पटेल यांनी मुक्त व्यापार, खाजगी मालकी हक्काचे समर्थन करणारे महान राजकीय नेते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 31 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता पोलादी पुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री, भ...
