Sand hauling and transportation : नायगांव तालुक्यातील मेळगांवच्या गोदापात्रातून राजरोसपणे रेतीउपसा व वहातूक -NNL
नांदेड| जिल्ह्यातील नायगांव (खै.) तालुक्यातील बहुचर्चित मेळगांव येथिल गोदापात्रातून गत काही दिवसापासून राजरोसपणे रेतीउपसा व वहातूक करण्यात येत असून संक्शन पंप व बोटीचा वापर करित राजाश्रय असलेली स्थानिकची काही व्हाॅईट काॅलर मंडळीच स्वतः रेतीतस्कर बनल्याने सोबतच, संगनमतातून आर्थिक हित असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाकडून डोळेझाकपणा करण्यात येत असल्याची संतप्त भावना जनतेतून चर्चित आहे.
सविस्तर वृत्त असे की, नायगांव तालुक्यातील एकेकाळी स्वच्छतेत पुरस्कारप्राप्त असलेले मेळगांव गत काही वर्षात विविध बाबींनी बहुचर्चित बनलेले असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा व प्रशासनातील कांही वरिष्ठांचा राजाश्रय असलेली येथिल 'निवडक' व्हाॅईट काॅलर मंडळी स्वतःच्या आर्थिक हितासाठी विविध उपक्रमांतून सरस ठरलेली असल्यानेच सद्या ते या गांवासह बहुचर्चित ठरत आहेत. त्याचाच प्रत्यय पून्हा एकदा या ठिकाणी गत काही दिवस...
