शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL
नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने भगवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. दिनांक 25 जून ते 10 जुलै या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून याच वेळी बूथ प्रमुख , शिव दूत प्रमुखांच्या नेमणुका करण्यात येणार असून उर्वरित शाखा प्रमुखांचे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , जिल्हा प्रमुख उमेश मुंडे , जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले , सह संपर्कप्रमुख सरदार गुरमीत सिंग टामाना , रावसाहेब महाराज , मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम , विधानसभा प्रमुख अशोकराव पाटील उमरेकर ,...
