नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेमार्फत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान -NNL
नांदेड। स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत दि.०१ जुलै, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान राबविणे बाबत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अधिभयान संचालनालय, मुंबई यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
त्यानुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने आज दि.०६ जुन २४ रोजी सकाळी ११.ते ०२ या वेळेत क्षेत्रिय कार्यालय क्र. ०१ ते ०६ अंतर्गत कल्याणनगर तरोडा (बु), हमालपूरा, विष्णुनगर, मस्तानपुरा, गणेशनगर, यशवंतनगर, देगावचाळ, गंगाचाळ, पक्की चाळ, मिमघाट, गोळ चाळ, त्रिपिटक बुध्द विहार परिसर, गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी नवीन कौठा अश्या विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले आहे.
सदर अभियानात महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांसह शहरातील स्वच्छता प्रेमी नागरीक, जेष्ठनागरीक, इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून वरील विविध ठिकाणच्या संपूर्ण पर...
