Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL
नांदेड| सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने घेतली पाहिजे. आपण कोणत्याही धर्माचे असू पण इतर धर्माबद्दल आदर बाळगावा असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.
गणेशोत्सव, ईद-ए- मिलाद, वर्षवासानिमित्त जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आर डी सी वडदकर, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सुरज गुरव, डी वाय एसपी आयपीएस कृतिका मॅडम, उपायुक्त गिरीश कदम, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, वसिम भाई शोयब तसेच गणेशोत्सव...
