Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत
लोहा| लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. तेव्हा या आरक्षण सोडत होताना तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे २०२५-३०या पाच वर्षांसाठी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच- उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ चे कलम ५ मधील तरतुदी नुसार आरक्षण निश्चित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आदेशीत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २७टक्के ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढली जाणार आहे.
तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती (एससी) साठी २० ग्रामपंचायत त्यात १० महिलांसाठी राखीव अस...
