“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL
नवीन नांदेड l या चिमण्यांनो परत फिरा रे ...! या चित्रपट गिता प्रमाणे हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी वर्गातील विद्यार्थांचा स्नेह मेळावा दि २९ सप्टेबर रोजी संपन्न झाला, यावेळी बालमित्र तबल तेहतिस वर्षांना एकत्र आले होते ,यातील सर्वच विद्यार्थांनी पन्नाशीचा टप्पा गाठत असल्याने त्यांच्यातील लहाणपणीचा उत्साह पुन्हा पहावयास मिळाला. यास्नेह मेळाव्यामुळे पुन्हा तेवढया जोमाने मैत्रीची गाठ जोडल्या गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या! तर शालेय जिवनाच्या आठवणीला उज्जाळा मिळाला .
शारदा भवन सोसायटीच्या हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी इयत्ताच्या सर्वच तुकड्याचा स्नेह मेळावा दि २९ रोजी हाँटेल आकृती येथे आयोजित करण्यात आला होता ,या मेळाव्यात दहावीच्या सर्वच तुकडीतील विद्यार्थांना आमंत्रीत करण्यात आले होते . यात १४१ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता मुंबई ,...
