The minor girl who protested got justice : मोर्चा धडकला अल्पवयीन मुलीस न्याय मिळाला
किनवट, परमेश्वर पेशवे| चार महिन्यापूर्वी किनवट येथील निर्भया राठोड या अल्पवयीन मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने एका नराधमाने फूस लावून पळवुन नेण्याची तक्रार पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आली होती.
या अनुषंगाने चार महिने उलटून देखील पीडित अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते शेवटी सर्वसामाजीक संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पीडित मुलीचे आणि आरोपीचे शोध लावण्यात पोलिसांना यश आले. सदरील घटनेच्या अनुषंगाने आरोपी याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा व तात्काळ अटक करा.
14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून आई-वडिलांच्या स्वाधीन करा. सदरील प्रकरणात चार महिने निष्काळजी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा. पीडित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करा आदी मागण्या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आल्या होत्या. आंदोलनाच...
