Friday, June 26

Tag: property worth 27 lakhs destroyed

illegal sand mining : अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

illegal sand mining : अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड तहसील प्रशासन व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी सय्यद मोहसीन, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मनोज जाधव, माधव भिसे, मारुती श्रीराम, महसूल सेवक बालाजी सोनटक्के व शिवा तेलंग यांच्या महसूल पथकाने पिंपळगाव निमजी परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या एक मोठी बोट, एक छोटी बोट व १२ तराफे आढळून आले. संबंधित बोटी नदीच्या मध्यभागी ठेवण्यात आल्या होत्या. सदर बोटी जप्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, मनोज जाधव व शिवा तेलंग यांनी धाडसाने नदीत पोहत जाऊन बोटी ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोटी व ...
error: Content is protected !!