District Collector Kardile : प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे : जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 80 टक्के नागरिक शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेशी जुळले आहेत. मात्र कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण सर्वच क्षेत्रात आम्हाला सुधारण्यास वाव आहे. त्यामुळे ज्यांनी सेंद्रियशेतीपासून शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे त्या प्रथीतयश शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषीक्षेत्राचे नेतृत्व करावे. कृषी विभाग त्यांना पाठबळ देईल, अशा आश्वासक शब्दात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या विकासात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा आणि नांदेड येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे 17 व 18 मार्च दोन दिवस हा महोत्सव सु...
