Saturday, May 16

Tag: Prof. Jagdish Kadam

Pushpa Jagadish Kadam : प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग

Pushpa Jagadish Kadam : प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|  पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले आहे . पुष्पा कदम यांनी जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका अशी शैक्षणिक सेवा केली आहे . त्यांनी नांदेड येथील मुलींचे हायस्कूल आणि मालेगाव येथील जि.प.हायस्कूल येथे दीर्घकाळ सेवा बजावली. उत्कृष्ट शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेतर्फे गौरव करण्यात आला होता. कुरूंदा येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब दळवी यांच्या कन्या तसेच साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन नातू असा परिवार आहे. आज सायंकाळी साडे पाच वाजता दिवंगत पुष्पा जगदीश कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य , कला , शिक्षण , राजकीय , सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती....
error: Content is protected !!