Manjaram’s primary health center : मांजरमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी ईमारत मोडकळीस
नायगांव/नांदेड| मांजरममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी ईमारत मोडकळीस आलेली असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी रुग्णसेवेसाठी तयार असलेल्या नविन ईमारतीचे तातडीने लोकार्पण करावे अशी मागणी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा. भवरे यांनी केली असून, त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी ईमारत तब्बल ४० वर्षापूर्वीची असल्याने अत्यंत जीर्ण झालेली आहे. येथे तिन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून दररोज जवळपास २०० बाह्यरुग्ण तपासणी होत असते. या केंद्राच्या अखत्यारित दहा उपकेंद्रासह त्याअंतर्गतची अनेक गांवे येतात.जून्या मोडकळीस आलेल्या ईमारतीत...
