Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL
नांदेड| राज्य स्तरीय युवा महोत्सव विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.
आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय महोत्सव आयोजन व नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीमध्ये सन 2024- 25 मधील राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आर्चरी, बास्केटबॉल, विश्व बेसबॉल, बुद्धिबळ व सेपक टकरा व विनाअनुदानित राज्यस्तरीय खेळ स्पोर्ट्स व टेनिस हॉलीबॉल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा बेसबॉल वयोगट 19 वर्षे मुले मुली व बुद्धिबळ 14 वर...
