Usmannagar ; उस्माननगर परिसरातील शेतात नुकसानीचे पंचनामे सुरु महसूल प्रशासन बांधावर
उस्माननगर l ऑगस्ट अखेरीस दि. २७ २८, २९ , ३० रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण ( पंचनामे ) करण्यासाठी महसूल प्रशासनाची टिम शेतकऱ्यांच्या शेतावर,बांधावर जाऊन करत आहेत.
उस्माननगर मंडळात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस ढगफुटी सदृश्य परिस्थितीत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदीकाठावरील शेतपिके पुराच्या पाण्यात अक्षरशा खरडून गेली आणि हातातोंडाशी आलेला घास नाहीसा झाला सोयाबीन,मुग , ऊस, कापूस , हाळद , तुर , भाजी पाला , अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी बैल , म्हैस , गाय , शेती उपयोगी साहित्य , पाण्यात वाहुन गेले. तर नुकसान झाले होते.
ही परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री , आमदार , जिल्हाधिकारी , सिईओ , तहसीलदार , मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तलाठी हिवंत , कृषी सहायक अधिकारी डफडे , ग्रामसेविका सौ.शिंदे , पोलिस पाटील...
