Organization of cultural program ; राष्ट्रीय व राज्य पथसंचलन शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – NNL
नांदेड | राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन पूर्व निवड चाचणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान संपन्न होत आहे.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध ५१ विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले आहेत. यामध्ये त्यांची शारीरिक चाचणी, मुलाखत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग यास तेवढेच महत्त्व असते. दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सांस्कृतिक क...
