Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी नांदेड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांच्या सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यासह अधिकारी यांनी दर्शन घेतले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.
१२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी गणेश अप्पा महाराज धनमणे यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले,...
