Wednesday, May 13

Tag: on the historical heritage of the village

Presentation of ‘White Paper’ : राज्य नाट्य स्पर्धेत ‘व्हाईट पेपर’चे सादरीकरण गावाच्या ऐतिहासिक वारसावर आधारित नाटक – NNL

Presentation of ‘White Paper’ : राज्य नाट्य स्पर्धेत ‘व्हाईट पेपर’चे सादरीकरण गावाच्या ऐतिहासिक वारसावर आधारित नाटक – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता.२६) ‘व्हाईट पेपर’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आले. दिनेश कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली इरफान मुजावर लिखित या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. जातीय आणि धार्मिक समन्वयाचा मुद्दा मांडणाऱ्या या नाटकाने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाचा मुख्य गाभा गावातील ऐतिहासिक जागेभोवती फिरतो. त्या जागेचा इतिहास नव्याने लिहिण्यासाठी स्थापन झालेल्या कमिटीमध्ये विविध जाती-पंथांच्या व्यक्तींचा समावेश असतो. मात्र, आपल्या धर्माशी ती जागा जोडलेली असल्याचा दावा प्रत्येक जण करत असतो. याच पार्श्वभूमीवर गावात वादळ उठते. यासोबतच, जातीय भेदभावाच्या छायेतून राहुल आणि माधुरीच्या प्रेमकथेला रंगमंचावर उतरवण्यात आले आहे. यातील एक संवाद, “हे लोक इतिहास विसरण्यास तयार नाहीत आणि तू भविष्याचा...
error: Content is protected !!