Wednesday, May 13

Tag: on June 30 at Matoshree Auditorium;Indrajit Deshmukh’s

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

नांदेड
नांदेड। इयत्ता 10 वी, 12वी आणि पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत सर्वांनाच चिंता असते. विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग कसा निवडावा यावर मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठाण या संस्थेने करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्यार्थी व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणारा परिपूर्ण कार्यक्रम म्हणजे करिअर गायडन्स प्रोग्राम आणि या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास विभागाचे मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध कवी - कथाकार, प्रेरणादायी व्याख्याते इंद्रजीत देशमुख विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक - मार्गदर्शक आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिजाऊ नगर, लातूर रोड, खूपसरवाडी, विष्णुपुरी, नांदेड- लातूर रोड येथिल मातोश्री प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित...
error: Content is protected !!