Sunday, June 28

Tag: on Friday regarding Sarpanch

Vaifani Gram Panchayat  : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा

Vaifani Gram Panchayat : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा

नांदेड, राजकीय
माहूर/नांदेड| माहूर तालुक्यातील मौजे वायफणी या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सौ. गोकर्णा सुरेश अंकुरवाड यांच्या विरुध्द दाखल झालेल्या तसेच 16 सप्टेंबर 2025 रोजी तीन- चतुर्थांश (%) मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार माहूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत "विशेष ग्रामसभा" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथे घेण्यात येणार आहे. याबाबत वायफणी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार माहूर यांनी केले आहे. या ग्रामसभेत विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलीत नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक आहे.सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्याकामी शिरगणना करण्याच्या पध्दतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल. या कामी दिनांक 1 ऑक्टोबर ...
error: Content is protected !!