नांदेडलाइफस्टाइल

Accident news ; बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

बिलोली, गोविंद मुंडकर। रेतीची वाहतूक करणाऱ्या एका दहा टायरी हायवा वाहनाने स्कुटी वरून जाण-या एकास जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी वरून जाण-या बेळकोणी येथील किशन वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.६ जुन रोजी दुपारच्या सुमारास बिलोली शहरातील नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर घडली आहे.विषेश म्हणजे या अपघातात वाघमारे यांच्या डोक्यावरून रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक गेल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चक्काचूर झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिलोली तालुक्यातील विविध गावांतील रेती घाटावरून मांजरा नदी पात्रातील लाल रेतीचे उत्खनन वैध व अवैध वाहतूक करण्यात येत आहे.रेती घाटातुन रेती भरून या रेती वाहनांद्वारे बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्हा व पर जिल्ह्यातही वाहतूक करण्यात येते.नेहमी प्रमाणे दि.६ रोजी रेती घाटावरून रेती भरून जाणा-या एम एच १२ यू एन ००३२ क्रमांकाच्या दहा टायरी हायवा वाहन चालकाने बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील रहिवासी किशन रामा वाघमारे यांच्या दुचाकी स्कुटीस जोराची धडक दिली.

या जबर धडकेत वाघमारे यांच्या डोक्यावरून रेतीने भरलेली गाडी गाडी गेल्यामुळे त्यांच्या डोक्याचा पुर्ण चेंदामेंदा झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिलोली ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले असून वृत्त लिहे पर्यंत बिलोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button