Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : कार्यकर्त्यांनी एक एक मत जोडण्यावर भर द्यावा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड जनमताच्या आधारे होणार असून, कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात मतदार यादी तपासणी करावी. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधून आवश्यक हरकती दाखल कराव्यात, आणि एक एक मत जोडण्यावर भर द्यावा. असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
हिमायतनगर येथील श्री साई मंदिराच्या परिसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर याशिवाय स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इ...
