Thursday, May 14

Tag: of the leather workers community

Elgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार आंदोलन

Elgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील कांही सक्रीय सामाजिक संघटनांची एक शिखर संघटना "चर्मकार ऐक्य परिषद" या नावाने स्थापन झाली असून त्या मार्फत आझाद मैदान मुंबई येथे येत्या गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात आपण सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली. नरसी (ता. नायगांव जि. नांदेड) येथे दिनांक ४ जुलै रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गंगाधर गंगासागरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात इंजि. चंद...
error: Content is protected !!