Wednesday, May 13

Tag: of fake fertilizers seized in Kinwat taluka

किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील तल्हारी शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना बोगस पोटॅश या खताची विक्री होत असतांना पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकून चारचाकी वाहनासह ४१ बॅग खत असा एकूण ५ लाख ५६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करूं कारवाई करण्यात आली. गुणवत्ता व गुणनियंत्रण निरीक्षक तथा पं.स.चे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांना तालुक्यातील तल्हारी या गावच्या शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना पोटॅश या खताची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, इस्लापूरचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव, बोधडीचे कृ.प. बाळासाहेब ठेंगे, कृषी सहाय्यक गजानन गोरे, धर्मेश पोगुलवार, सुनीता चातरे व रेणुका बुलबुले यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एम.एच.१४ एच.यू. ८५६३ क्रमांकाच्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा मॅ...
error: Content is protected !!