Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL
लोहा| दैनंदिन जीवनात गावातील भौतिक सुविधेचा अभाव असेल तर ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.लोकप्रतिनिधी जागरूक नसेल ते त्या भागातील जनतेंनी जावे कुठे(?) असा प्रश्न उभा राहतो.स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून ऐन पावसाळ्यात लोह्यात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या बेरळी(खु) या गावाची नदीमुळे दोन भाग झाले. शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी तसेच अन्य कामासाठी ग्रामस्थांना या नदीपात्रातून जाताना मोठी अडचण उदभवत आहे.
पूल व्हावा ही ग्रामस्थांची इच्छा ..! पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व बहिरे प्रशासन याना अनेक वर्षा पासून बेरळी ग्रामस्थांच्या हाका ऐकू येत नाहीत ! लोहा शहराजवळ असलेल्या बेरळी खुर्द गावातून नदी छोटा ओढा गेला त्यामुळे गावचे विभाजन झाले आहे .अर्ध्येगाव नदी पल्याड आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दररोज नदी पात्रातून यावे लागते.,शेती तसेच अन्य कामासाठी दररोज होण...
