Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा
मुंबई| मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असे नमूद करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण लोकसंख्या, जन्मदर, मृत्युदर आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना केली आहे.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, दफनभूमी तसेच स्मशानभूमी उपलब्धतेची मुंबई येथे खूपच गंभीर समस्या आहे, त्याचप्रमाणे राज्यात गावागावातही अलीकडच्या काळात या संदर्भातील अडचणी निर्माण होत आहेत, बहुतांश ठिकाणी शासनाने दफनभूमी आणि स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे, काही ठिकाणी खाजगी स्वरूपाची ही व्यवस्था आहे परंतु, वेगवेगळ्या समाजाची वाढलेली लोकसंख्या, वाढलेल्या वस्त्या यामुळे अनेक ठिकाण...
