कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा -NNL
नांदेड| कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत नांदेड जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामात क्रॉपसॅप, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, राज्य पुरस्कृत योजना या योजनांच्या समन्वयातून सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी एकूण जिल्ह्यात एकूण ३०८ पिकनिहाय शेतीशाळा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एका शेतीशाळेमध्ये २५ शेतकऱ्यांच्या समावेश असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ७०० शेतकऱ्यांना वरील तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तरी या शेतीशाळेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवणे, शेतीसंदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्...
