MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले
मुंबई| राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी म्हणून उपाययोजना आहेत मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे, हे रोखण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एका अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जात असताना औसा तालुक्यात दोन दुचाकीचा अपघात ...
