नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL
नांदेड| कोरोना काळापासून बंद पडलेल्या विमान सेवाला नांदेडमधून अखेर सुरुवात झाली आहे. स्टार एअर कंपनीने नागपूर-नांदेड-पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर नांदेड-पुणे विमानाची सुरुवात झाली आहे. पाहिलं विमान दिनांक २७ जून रोजी पुण्याच्या दिशेनं उड्डाण घेतली असून, ८० आसन क्षमतेच्या विमानात नांदेडहून पहिल्याच दिवशी ५२ प्रवाशांनी नांदेडहून पुण्यासाठी 40 मिनिटांचा प्रवास केला आहे.
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा प्रसिध्द असल्यामुळे पंजाब, अमृतसरसह अन्य राज्यातुन शिख समाज बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नांदेडात येत असतात. नांदेड येथून विमानसेवा पूर्ववत सुरु झाल्यामुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आता कमी वेळात नांदेड शहर गाठता येणार आहे. स्टार एअर इंडिया या विमान कंपनीने नागपूर -नांदेड- पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर दिनांक २७ जून रोजी प्र...
