Friday, May 15

Tag: Nana Patole

Nana Patole । तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले -NNL

Nana Patole । तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई। राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची...
Nana Patole | शेतकऱ्यांसाठीच्या डीबीटी योजनेत मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, बाजारभावापेक्षा चौपट दराने खरेदी – नाना पटोले -NNL

Nana Patole | शेतकऱ्यांसाठीच्या डीबीटी योजनेत मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, बाजारभावापेक्षा चौपट दराने खरेदी – नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेत सुधारणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नसताना त्यात बदल केले गेले. कृषी आयुक्तांनी त्याला विरोध केला असता त्या कृषी आयुक्ताचीच बदली करण्यात आली. या डीबीटी योजनेतून मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप करत सरकारने या घोटाळ्यावर १५ दिवसात उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कृषी डीबीटी योजनेत जे साहित्य खरेदी केले ते बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन खरेदी करण्यात आले. हे कंत्राटही गुजरातच्याच एका कंपनीला देण्यात आले. सरकार शेतकऱ्...
पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, असा घणघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्र...
पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले -NNL

पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे. पोर्शे कार दुर्घटनेनंतर ड्रग्ज व ससून रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी ड्रग्ज माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचे उघड झाले आहे. ससूनमध्ये सरकारच्या आशिर्वादाने अनेक विद्वान लोक बसले आहेत, असा घणाघाती आरोप करत ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळात पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या मुद्यावर बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, पोर्शे कार दुर्घटनेतील आरोपीसंदर्भात फक्त दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांना चिरडले एवढाच मुददा नाही तर त्यात ड्रग्जचा प...
राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? – नाना पटोले -NNL

राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? – नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण राज्य सरकार मात्र फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे यात मश्गूल आहे. सरकारला लोकांच्या जगण्या मरण्याचे काही घेणे देणे राहिले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, जून महिना संपत आला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. जनता भयंकर दुष्काळाचा सामना करत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही. ...
विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना पटोले -NNL

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे अस...
error: Content is protected !!