Murder Crime ; पैशाच्या वादातून एकाचा खून; मालवाहू वाहनाने धडक देऊन केले डोक्यावर टॉमीने वार -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। उसनवारी चे चाळीस हजार रुपये परत देत नसल्याचा वाद विकोपाला जाऊन काल दिनाक ५ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास आरोपीने शेळी चरण्यासाठी जात असलेल्या मयत किरण विट्ठल खिरे वय ( २६ ) यांच्या अंगावर मालवाहू टाटा एस गाडी टाकून जखमी केले. व डोक्यावर गाडी तील टामी ने वार केले यात किरण विट्ठल खिरे याचा मृत्यू झाला.पैशाचा वादातून खून झाल्याची ही खळबळजनक घटना माहूर तालुक्यातील हिंगणी येथे घडली.
मौजे हिंगणी येथील किरण विट्ठल खिरे वय २६ वर्ष हे नेहमीप्रमाणे सकाळी बकऱ्या घेऊन जंगलाकडे जात असताना गावा पासून केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर आरोपी संतोष उत्तम शिंदे वय ३२ वर्ष रा.हिंगणी याने आपल्या स्वतःच्या मालकीच्या टाटा एस छोटा हत्ती मालवाहू वाहन क्रमांक एम एच १२ यु एम ४३४५ भरधाव वेगात नेऊन किरण ला जोरदार धडक दिली. त्यामुळे किरण खिरे याच्या डोक्यात जबर मार लागला व तो खाली पडला आरोप...
