Nanded news : उद्धट वर्तन करणाऱ्या परप्रांतीयाला नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा चोप
नांदेड| शहरात एका परप्रांतीय व्यक्तीने स्थानिकांशी उद्धट आणि आक्रमक भाषेत वागल्याचा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धारेवर धरत चोप देऊन माफी मागायला लावली आहे. हा प्रकार शहरातील बसस्थानक परिसरात घडला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड शहरातील बस स्थानकात असेलेल्या सुलभ शौचालय मधील परप्रांतीय व्यक्तीला मराठी माणसाला मराठीत बोला असे सुचविले असता उद्धट भाषेचं उपयोग करत ... ज्या नही बोलता क्या....? करना है करले... असे म्हणत परप्रांतीय व्यक्तीने स्थानिक नागरिकांना अपमानास्पद भाषेत उत्तर दिले. या वागणुकीची माहिती मिळताच निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी त्याला रोखून त्याच्या वर्तनाबद्दल जाब विचारला.
मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष शुभम पाटील आणि कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतीयाला अद्दल घडवीत प्रसाद दिला. महाराष्ट्रातील सम...
