Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL
लोहा| दैनंदिन जीवनात आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असतो तसेच प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून सण उत्सव गणेशोत्सव , ईद व सर्व धार्मियांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच पोहचणार नाही. यांची काळजी घ्यावी असे आवाहन लोहा तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्स निमितताने शांतता समितीची बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलत होते. गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,माजी नगराध्यक्ष कि...
