seasons in politics : राजकारणात ऋतूप्रमाणे पक्ष बदलणारे नेते अन् कार्यकर्ते -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर तालुक्यात ऋतूप्रमाणे अनेक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची या पक्षातून त्या पक्षात जाण्याची चढाओढ सुरू आहे.या आयाराम-गयारामांची प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळी भूमिका पाहून या संघातील मतदारांची करमणूक होत आहे. काही कार्यकर्ते असे आहेत की, ज्यांना घरात कोणीच विचारत नाही, असेही निवडणुकीच्या निमित्ताने स्वतःचे महत्त्व वाढवताना दिसत आहेत.
किनवट-माहूर संघात राजकारण दर निवडणुकीच्या निमित्ताने विविध घडामोडींनी गाजते.प्रत्येक निवडणुकीमध्ये नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांची भूमिकाही वेगवेगळी असते. 'एकनिष्ठ' हा शब्द माहूर व किनवट मतदार संघातील राजकारण्यांनी वाळीत टाकलेला आहे. जनतेला गृहित धरून जसे आपल्याला सोयीचे होईल, तसे राजकारण करण्यात नेतेमंडळी मग्न असतात. त्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकीत त्यांची भूमिका वेगवेगळी दिसते. नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त...
