On the auspicious occasion of Mahashivaratri : महाशीवरात्रीच्या शुभमुहूर्तावर लाखो भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर भगवान नवसाला पावनारा म्हणुन संबध जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.१७ मंगळवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- तेलंगाना, आंध्रप्रदेशातील लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. या निमित्ताने हिमायतनगर शहरात भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांनी मध्यरात्री १२ च्या नंतर दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने भाविक भक्तांना विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे दुधाचे वितरण, श्री विश्वकर्मा कारपेंटर एकता युनियन तर्फे केळीचे वितरण, बुलढाणा अर्बन, महाराष्ट्र बैंक व पवन फर्निचर तर्फे भाविकांना...
