Lakhs of devotees take darshan of Sri Ambabai : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतले कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन -NNL
कोल्हापूर| बुधवार पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक भाविक भक्त ठिक ठिकाणी देव दर्शनाला जात असतात, याच पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणार नवीन वर्ष सुख समृद्धी व आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत अंबाबाई च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठया रांगा लाऊन मंदिरामध्ये गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. सध्या वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी ह...
