Sunday, June 28

Tag: Kandhar taluka

Kandhar News : कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ठार 

Kandhar News : कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ठार 

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे | गेल्या दोन दिवसापासून कंधार तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून संततधार पावसामुळे गाढ झोपेत असलेले पती पत्नीवर भिंत कोसळून ते जागीच ठार झाल्याची ऱ्हदयद्रावक घटना तालुक्यातील कोटबजार येथे घडली असून या वृध्द दाम्पत्याच्या दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत कोटबाजार ग्रामस्थांच्या वृतानुसार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर (वय ६८ वर्ष) व त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर शेख अमीन (वय ७२ वर्ष) हे आपले रोजचे दैनंदिन कामकाज आटोपून नेहमी प्रमाणे जेवण करून गाढ झोपेत होते. गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असून या पावसामुळे नदी नाले यांना प्रचंड प्रमाणात पुर आला आहे. या सततच्या पावसामुळे अनेक नागरिकांची घरे कोसळत आहेत. तर काही ठिकाणी गुरेढोरे देखील वाहून गेल्याचे समजते. याच पार्श्वभूमीव...
error: Content is protected !!