Dr. Mahesh Kumar Doifode ; समाज घडवतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे – NNL
नांदेड l लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहतो. नेहमीच माध्यमाने समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . शोषित , पीडित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीतून आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लढा उभारणार्या पत्रकारांनी नेहमीच संघर्ष केला आहे. हा संघर्ष करत असताना आणि लोकशाहीला बळकटी देत असताना पत्रकारांनी स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
मराठी पत्रकारितेची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज संग्रामजी पोमदे महापालिका रुग्णालय,जंगमवाडी येथे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते ...
