Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL
नांदेड। औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत.
पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01451 पुणे–करीमनगर विशेष गाडी दिनांक 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी व 04 आणि 11 नोव्हेंबर, 2024 रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी स...
