Kiran Ambekar ; पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक- किरण अंबेकर
नांदेड| पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले. ते पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम सन 2025-26 पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे महत्व असल्याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आज कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रशिक्षक शामराव बिंगेवार तसेच म...
