village cleanliness : ग्रामस्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक SBMSSG2025 ॲपव्दारे अभिप्राय नोंदवा
Active participation of citizens is necessary for village cleanliness नांदेड| ग्रामीण भागातील स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गाव पातळीवर स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करण्यात येणार असून, त्याचबरोबर नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी SBMSSG2025 हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून त्यामधील प्रश्नावलीला उत्तरे द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
SBMSSG2025 ॲपचा वापर करताना सर्वप्रथम मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून, भाषेची निवड करून सहभाग नोंदवता येतो. ॲपमध्ये सर्वेक्षणाची माहिती वाचून सर्वेक्षण सुरू करा या पर्यायावर क्लिक केल्यावर राज्य, ...
