Beware! : सावधान ! तुमच्या सोशल मिडीया खात्याची निगराणी होत आहे -NNL
नांदेड,अनिल मादसवार| विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत जिल्ह्यातील सोशल मीडियाचे सनियंत्रण जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर राजकीय पोस्ट टाकताना सर्वांनी सावध असावे, आचार संहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस दलातील अन्य सदस्यांची यासंदर्भात बैठक झाली असून सायबर सेलला निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एमसीएमसी ( माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती ) मध्ये सायबर सेलची एक संपूर्ण टीम यासाठी कार्यरत झाली आहे. यापूर...
