शेतकऱ्याची बाजू न ऐकताच महसुलची धडक कार्यवाही; महसुलचा अजब कारभार माफियांना अभय शेतकऱ्यांना दिला जातोय त्रास -NNL
किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांड्यातील अल्पभूधारक शेतकर्याने त्यांच्याच शेतातील विहिरीचा मुरुम त्याच शेती सुधारण्याच्या कामावर वापरत असतांना महसूलच्या पथकाने मुरुमासह दोन ट्रॅक्टर्स ७ जून रोजी पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. मुरुमाचे अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक करणार्यांना अभय दिल्या जाते. तर शेतकर्यांच्या शेती सुधार कामावरच्या वैध मुरुमाचे ट्रॅक्टर्स धरले जातात. तहसिलदारांनी दिलेल्या उद्दीष्ठ्य पूर्ण करण्याच्या नादात शेतकर्याची बाजू ऐकून न घेता महसूल पथकाने कारवाई केली. मुरुमच अवैध होता तर या अवैध कारवाईचा महसुल प्रशासनाला जबाब तर द्यावाच लागणार असल्याचे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.
तहसिलदार शारदा चौंडेकरांनी महसूल यंत्रणेला गौण, खनिज, रेती, मुरुमाच्या अवैध व्यवसायिकांकडून वार्षिक उद्दीष्ठ्य निश्चीत करुन दिल्याची सबब या कारवाई दरम्यान कर्मचार्यांनी बोलून...
