Install high security registration : हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा !
नांदेड| केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या यांच्या सुचनेनुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 मार्च 2025 अशी आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता शासनाने 3 संस्था, उत्पादकांची निवड राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे केली आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध...
